esakal | मनसुख हिरेन प्रकरण: आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला अटक

बोलून बातमी शोधा

Sunil-Mane-Mumbai-Police
मनसुख हिरेन प्रकरण: आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला अटक
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणात NIAने आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला आज अटक केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी सर्वप्रथम सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर NIAने पोलीस अधिकारी रियाझ काझीला अनेकदा चौकशीसाठी बोलावल्यानंतर ११ एप्रिलला अटक केली. त्यापुढे NIA चा तपास सुरू होता. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचमधील अनेक पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली जात होती. त्यानंतर अखेर मनसुख हिरेन प्रकरणात आणखी एका पोलिसाला अटक करण्यात आली. सुनील माने यांनाही अनेकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर आज NIAने माने यांना अटक केली.

हेही वाचा: हे वाचून मला तर धक्काच बसला- राज ठाकरे

स्फोटकांच्या कटात सामील असणे आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणे या आरोपांखाली सचिन वाझेचा सहकारी रियाज काझीला अटक करण्यात आले होते. या प्रकरणातील ही मुंबई पोलिसांची दुसरी अटक होती. त्यानंतर अँटिलिया स्फोटक प्रकरणात NIAने पोलिस अधिकारी सुनिल मानेला आज अटक केली. माने यांनीच या प्रकरणात मनसुखवर गुन्हा कबूल करण्यासाठीही दबाव टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: मनसुख हिरेन प्रकरणात WhatsApp कॉल ठरला महत्त्वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण घडलं तेव्हा सुनील माने हे मुंबई क्राईम ब्रँचमध्ये होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांमधील ही तिसरी अटक आहे. ज्या रात्री मनसुख हिरेन यांना फोन आला आणि त्यांची हत्या झाली, त्या रात्री सुनील माने हे सचिन वाझे यांना भेटले होते. माने हे बराच वेळ सचिन वाझेसोबतच होते. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण अशा दोन्ही प्रकरणात माने यांचा समावेश असल्याचं दिसत आहे. म्हणून एवढे दिवस चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, असं सांगितलं जात आहे.