esakal | मनसुखचा फोन त्या माणसानेच हिसकावून घेतला; NIAचा दावा

बोलून बातमी शोधा

मनसुखचा फोन त्या माणसानेच हिसकावून घेतला; NIAचा दावा

Sachin Waze Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे

मनसुखचा फोन त्या माणसानेच हिसकावून घेतला; NIAचा दावा
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारं प्रकरण म्हणजे मनसुख हिरेन हत्या प्रकरण. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरण या दोन्ही प्रकरणाचा तपास NIAकडून केला जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील सचिन वाझे, रियाझ काझी आणि सुनील माने या तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुनील माने याला अटक केल्यानंतर २८ एप्रिलपर्यंत NIA कोठडी देण्यात आली होती. ही कोठडी वाढवून मिळवण्यासाठी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याची NIA कोठडी १ मे पर्यंत वाढवली. या सुनावणीदरम्यान NIA कडून काही खळबळजनक दावे करण्यात आले.

हेही वाचा: Sachin Waze Case: मनसुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

NIA च्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानुसार, मनसुखच्या हत्येच्या आदल्या रात्री सुनील मानेने स्वत:चा फोन बंद करून स्वत:च्या बँगेत ठेवला आणि ती बँग सहकाऱ्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितली. त्यानंतर सुनील माने खासगी गाडीने कळवा येथे पोहचला. त्या ठिकाणी वाझे रुमाल खरेदी करून मानेच्या गाडीत बसला. त्यानंतर दोघं रेतीबंदर परिसरात पोहोचले. त्या ठिकाणी मानेनेच तावडे या नावाने मनसुखला फोन केला आणि बोलवून घेतलं. मनसुख तेथे आल्यानंतर खुद्द सुनील मानेनेच मनसुखच्या त्याचा फोन हिसकावून घेतला.

हेही वाचा: मनसुख हिरेन प्रकरणात WhatsApp कॉल ठरला महत्त्वाचा

वकिलांनी असाही दावा केला की, मानेने फोन काढून घेतल्यानंतर बंद केला आणि त्यानंतर माने व वाझे दोघांनी मिळून मनसुखला दुसऱ्यांच्याच ताब्यात देऊन टाकलं. त्यानंतर सुनील माने जेव्हा वसईला गेला, तेव्हा त्यानेच मनसुखचा मोबाइल पुन्हा सुरू करून मनसुख हा वसईला गेल्याचं दाखवत आली आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला.

NIA च्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आलेल्या दाव्यांचा अधिक तपास करण्यासाठी न्यालायलाने सुनील मानेची कोठडीची मुदत वाढवावी अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. दोन्ही वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने सुनील मानेच्या NIA कोठडीत 1 मे पर्यंत वाढ केली.