सचिन वाझेसोबत हॉटेलमध्ये दिसलेल्या महिलेचं नाव मिना जाँर्ज ?

Sachin-women.jpg
Sachin-women.jpg

दक्षिण मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सचिन वाझेसोबत दिसलेल्या त्या महिलेला NIA कार्यालयात आणण्यात आलं आहे. महिलेचा संपूर्ण चेहरा स्कार्फने झाकलेला होता. महिलेला कार्यालयात आणताना NIA कडून कमालीची दक्षता बाळगण्यात आली. महिलेची ओळख पटू नये म्हणून मागच्या गेटने महिलेला कार्यालयात प्रवेश देण्यात आला. महिलेचा चेहरा दिसू नये म्हणून मागच्या गेट समोर  NIA  अधिकाऱ्यांनी गेटच्या आडवी एक गाडी उभी केली होती. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सचिन वाझेसोबत ही महिला दिसली होती. सचिन वाझेसोबत दिसलेल्या त्या महिलेचं नाव मिना जाँर्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सचिन वाझे प्रकरण हे सध्या महाराष्ट्रातील बहुचर्चित प्रकरणांपैकी एक आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होताना दिसत आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण अशा दोन्ही प्रकरणाचा तपास सध्या NIA करत आहे. याच तपासादरम्यान, सचिन वाझे हा दक्षिण मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये १०० दिवस वास्तव्यास असल्याचे उघड झाले. त्याच्यासोबत एक महिलादेखील असल्याची माहिती होती. त्या महिलेची NIAने गुरूवारी कसून चौकशी केली. NIAचे पथक या महिलेचा तपास करत होते. अखेर गुरुवारी NIAने त्या महिलेच्या घरी धडक मारली.

NIAच्या पथकाने त्या महिलेचे नाव किंवा ओळख अद्याप उघड केलेली नाही. मात्र त्या महिलेच्या घराची काल झाडाझाडती घेण्यात आली. तसंच तिची दीर्घ काळ कसून चौकशी करण्यात आली, असं NIAच्या अधिकाऱ्याने सांगितले. सचिन वाझेसोबत असलेल्या या महिलेकडे वाझेचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम होते. ती दोन वेगळ्या ओळखपत्रांसह हे काम करायची. वाझेकडे असणाऱ्या काळ्या मर्सिडीजमधील नोटा मोजण्याच्या मशिनचा वापर ही महिला करत अशा माहिती NIAच्या अधिकाऱ्यांनी दिली.

NIAने गुरूवारी बाबुलनाथ येथील हॉटेल कम क्लबमध्येही शोधकार्य हाती घेतले. त्या क्लबमधून सचिन वाझेने वापरलेल्या ८ सिम कार्ड्ससंबंधीची कागदपत्रे मिळाली असल्याचा दावा NIAने केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाझेच्या सांगण्यावरूनच नरेश गोरला या कटात सामील करून घेण्यात आले. वाझेने वैयक्तिक वापरासाठी नरेश गोरकडून आठ सिम कार्ड्स मागून घेतली. गोरने गुजरातमधून ही सिम कार्ड्स आणून सचिन वाझेचा विश्वासू विनायक शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली, असं NIAच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 

(संपादन - दीनानाथ परब)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com