Anil Deshmukh Case: 'मला माफीचा साक्षीदार करा'; सचिन वाझेंचा कोर्टात अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh Sachin Waze CBI Custody

'मला माफीचा साक्षीदार करा'; सचिन वाझेंचा कोर्टात अर्ज

मुंबई : बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. मनी लॉंडरिंग प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात वाझे यांनी अर्ज दाखल केला आहे. अनिल देशमुख हे आरोपी असलेल्या प्रकरणात त्यांनी अर्ज दिला असून त्यांच्या या अर्जावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे.

(Sachin Waze Anil Deshmukh Case)

हेही वाचा: शिवसेनेचा 'पाचवा' नेता ईडीच्या रडावर; मंत्र्यांचाही पाय खोलात

मनी लॉंडरिंग प्रकरणात अटकेत असलेले अनिल देशमुख यांच्या केसमध्ये माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या विरोधात बोलण्यास तयार असल्याचं त्यांनी या अर्जात सांगितलं आहे. त्यांच्या या अर्जामुळे सीबीआयच्या तपासासाठी मदत होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी सीबीआय कोर्टात साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्याचबरोबर सीबीआयनकडून वाझे यांचा जबाब सीआरपीसी १६४ अन्वये नोंदवण्यात आला आहे.

सचिन वाझे यांना काही अटी देऊन त्यांना माफीचा साक्षीदार होण्याची हमी दिली होती. दरम्यान वाझे यांनी दाखल केलेल्या अर्जावर ३० मे रोजी कोर्टत सुनावणी होणार आहे.

Web Title: Sachin Waze Money Laundering Case Witness The Apology Application

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top