esakal | मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin waze

मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : सचिन वाझेवर (Sachin waze) मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात (Wockhardt hospital) ओपन हार्ट सर्जरी (open heart surgery) करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना हृदय विकाराचा (heart problem) त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाबाहेर सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: टंचाईग्रस्त कांबे गावाला गणेशोत्सवात रोज टँकर; हायकोर्टात सरकारची हमी

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे गेले काही दिवस भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.यांना हृदय विकाराचा त्रास असल्याने चांगल्या उपचारासाठी पाच दिवसांपूर्वी मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले .त्यांच्यावर सोमवारी रात्री ओपन हार्ट सर्जरी केल्याची माहिती त्यांच्या वकिला आरती कालेकर यांनी दिली.

वाझे यांना हृदया संबंधी समस्या जाणवल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केल्याचा दावा, वकिलांनी याआधी कोर्टात केला होता.वाजेना वोकहार्ट रुग्णालयात दाखल केल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली.सध्या ते आयसीयू मध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. कार्डिअँक सर्जन डॉ कमलेश जैन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ अंकुर आणि डॉ केदार यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली असल्याचे ही त्या म्हणाल्या.

loading image
go to top