esakal | मधुमेह नियंत्रणासाठी सुरक्षित इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्र महत्वाचे
sakal

बोलून बातमी शोधा

मधुमेह नियंत्रणासाठी सुरक्षित इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्र महत्वाचे

इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्‍या मते जगातील सहापैकी एक मधुमेहाने पीडित व्‍यक्‍ती भारतातील आहे.

मधुमेह नियंत्रणासाठी सुरक्षित इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्र महत्वाचे

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: अंदाजे 77 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्‍त असणारा भारत हा चीननंतर जगातील दुसरा सर्वात प्रभावित देश ठरला आहे. इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्‍या मते जगातील सहापैकी एक मधुमेहाने पीडित व्‍यक्‍ती भारतातील आहे. या आजाराचे योग्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे अत्‍यंत आवश्‍यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
 
मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींची संख्‍या वर्ष 2045 पर्यंत 134 दशलक्षपर्यंत वाढण्‍याचा अंदाज वर्तवला जात आहे. मधुमेह हा देशातील गंभीर आरोग्‍यविषयक आजार बनला आहे. भारतात या आजाराचे सर्वाधिक रूग्ण होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. मधुमेहाला वेळेत आळा घातला नाही तर हा आजार सर्वाधिक मृत्यूस कारणीभूत ठरण्याची भीती ही व्यक्त होत आहे. 

टाइप 1 मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींसाठी इन्‍सुलिन हा प्रमुख उपचार आहे. पण तोंडी औषध सेवन करण्‍याची थेरपी, आहार आणि व्‍यायामावर उत्तम नियंत्रण नसलेल्‍या टाइप 2 मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना देखील त्‍यांच्‍या रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी आणि हृदयविषयक आजार, स्‍ट्रोक, पेरिफेरल व्‍हॅस्‍कुलर डिसीज, मूत्रपिंड आजार इत्‍यादी सारख्‍या दीर्घकालीन आजारांवर प्रतिबंध ठेवण्‍यासाठी इन्‍सुलिन इंजेक्‍शन्‍सची गरज भासू शकते.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मधुमेह नियंत्रणासाठी सुरक्षित इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्र महत्वाचे आहे. इन्‍सुलिन शरीरामध्‍ये योग्‍य प्रमाणात शोषले जाण्‍यासाठी आणि स्‍नायूला टाळण्‍यासाठी त्‍वचेखालील चरबीच्‍या स्‍तरामध्‍ये योग्‍यरित्‍या इंजेक्‍ट करणे गरजेचे आहे. प्रत्‍येक वेळी नवीन ठिकाणी इंजेक्‍शन देणे आणि प्रत्‍येक वापरादरम्‍यान सुई बदलणे देखील महत्त्वाचे आहे.

सुईचा पुनर्वापर आणि अयोग्‍य इंजेक्‍शन तंत्रामुळे समस्‍या आणि औषधोपचारामध्‍ये चुका होऊ शकतात. सुईच्‍या पुनर्वापरामुळे सुईचे टोक बोथट होण्‍यासोबत वाकू शकते, ज्‍यामुळे वेदना आणि रक्‍तस्‍त्राव वाढू शकतो. व्‍यक्‍तीच्‍या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी योग्‍य इन्‍सुलिन इंजेक्‍शन तंत्राचा अवलंब करणे आवश्‍यक आहे,'' असे नारायण हेल्‍थ सिटी बेंगळुरूच्‍या एन्‍डोक्रिनोलॉजी, डायबिटीज अॅण्‍ड मेटाबोलिझम विभागाचे सल्‍लागार आणि प्रमुख डॉ. सुब्रमण्‍यम कन्‍नन म्‍हणाले.

अधिक वाचा-  यशवंत जाधवांच्या ऑडिओ क्लिपवरुन मुंबई पालिकेत भाजप- शिवसेना सदस्यांचा राडा

नर्सिंग स्‍टाफला इन्‍सुलिन इंजेक्‍शन्‍सचा वापराबाबत प्रभावी माहिती आणि प्रशिक्षण देणे महत्वाचे असून उत्तम ग्‍लायसेमिक नियंत्रणासाठी इन्‍सुलिन सुईंचा पुनर्वापर करणे टाळले पाहिजे,'' असे मुंबईतील भक्‍ती वेदांत हॉस्पिटल अॅण्‍ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्‍या एन्‍डोक्रिनोलॉजीचे आणि मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज एन्‍डोक्रिनोलॉजी एँड न्‍यूट्रिशन (आयएनडीईएएन) क्लिनिकचे कन्‍सल्‍टण्‍ट एन्‍डोक्रिनोलॉजिस्‍ट डॉ. अमेय जोशी यांनी सांगितले. 

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Safe insulin injection techniques are important for diabetes control

loading image