

Mumbai 18 coach Local Train
ESakal
मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वे १८ डब्यांच्या लोकल ट्रेनची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. ज्यामुळे भविष्यात गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकते. अधिकाऱ्यांच्या मते, ही महत्त्वाची चाचणी १४ आणि १५ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील विरार-डहाणू रोड सेक्शनवर घेतली जाईल.