राज्यातील सर्वच धोकादायक उद्योगांचे सेफ्टी ऑडिट!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

  • तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी
  • उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आदेश

मुंबई ः उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यानी घेतलेल्या महत्वपुर्ण बैठकीनंतर औद्योगिक सुरक्षेला प्राधान्यता देण्यात येणार आहे. तारापूर एमआय़डीसीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धाोकादायक कंपन्यांचे ऑडीट करण्यात येणार आहे.

अशा घटना पु्न्हा घडू नयेत यासाठी  यादृष्टीने कठोर पावले उचलावीत असे निर्देश, उद्योगमंत्री  सुभाष देसाई आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहे. तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी प्रधान सचिव कामगार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

#CAA ला समर्थन करणाऱ्या शाळांना नोटीसा , भाजपची टीका

औद्योगिक सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून सर्वच धोकादायक वर्गातील उद्योगांची तपासणी उद्योग व त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्फत करण्याचे तसेच सेफ्टी ऑडीट करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

काय होते तारापूर एमआयडीसीती कंपनीतील स्फोट प्रकरण

पालघर ः तारापूर येथिल एमआयडीसीतील विकास केमीकल कंपनीत भीषण स्फोट झाला होता. या स्फोटामुळे परिसरातील 10 किलोमीटर पर्यंतच्या हादरे बसले होते. स्फोटाचा आवाज 25 किलोमीटर पर्यंत ऐकू आला होता. या स्फोटात कंपनीच्या मालकासह आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. या कंपनीमध्ये अमोनियम नायट्रेट हे स्फोटक रसायन तयार केले जात होते. स्फोटानंतर संपुर्ण परिसराचा विजपूरवठा तत्काळ बंद करण्यात आला होता.

तारापूर एमआयडीसीतील एका कंपनीत भीषण स्फोट आठ जण दगावल्याची शक्यता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Safety audit of all hazardous industries in the state!