Mumbai Rain Update : वाहन चालकांनो पावसाळ्यात वाहने जपून चालवा; गेल्यावर्षी मुंबईत २८३ जणांनी गमावला जीव 

पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व राज्यांना मोटार वाहन कायदा २०१९ च्या कलम १९८अ ची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करत आहोत.
safety measures in monsoon Drivers should drive safely during rainy season
safety measures in monsoon Drivers should drive safely during rainy seasonSakal

Mumbai News : पावसाळा सर्वांनाच आवडीचा असला तरी वाहनचालकांसाठी त्रासदायक असतो. पावसात मोटार चालवणे सोपे थोडे दुर्लक्ष झाल्यास किरकोळ ते गंभीर अपघात होतात. ते टाळण्यासाठी पावसाळ्यात मोटारीची योग्य ती काळजी घ्यावी अन्यथा जीवावर बेतू शकते. मुंबई मुंबई पुणे एक्सप्रेसवर २०२३ मध्ये वर्षभरात ६२ जणांचा मृत्यू झाला होता. तर मुंबई शहरात २८३ जणांचा रस्ते अपघातात जीव गेला होता. 

सेव्ह लाईफ फौंडेशनच्या सार्वजनिक धोरण आणि संशोधन संचालक करुणा रैना यांनी सांगितले कि, पावसाळ्यात देशभरातील सर्व प्रकारच्या रस्त्यांवर पायाभूत सुविधांच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. मुख्य घटकांमध्ये रस्ता सुरक्षा ऑडिट आणि नियमित देखभाल कामाचा अभाव यासह खराब रस्ते बांधकाम साहित्याचा समावेश आहे. सतत जड वाहतूक, पाणी साचणे, गळती आणि सदोष ड्रेनेज यांमुळे, रस्त्यांची प्रचंड झीज होते त्यामुळे खड्डे पडतात या खड्ड्यांमुळे रस्त्यावर जीवघेणे अपघात होतात.

पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व राज्यांना मोटार वाहन कायदा २०१९ च्या कलम १९८अ ची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करत आहोत. कारण त्यानुसार अपघातास रस्त्यांचे मालक, अभियंते आणि कंत्राटदार इतर गोष्टींबरोबरच रस्त्याच्या अपुर्‍या देखभालीसाठी जबाबदार धरले जाते.

दरम्यान गेल्यावर्षी एसटी महामंडळाच्या अनेक बसस्थानक परिसरात खड्डे पडले होते. या पावसाळ्यापूर्वी बसस्थानक परिसरातील सर्व खड्डे मुजवून सपाटीकरण करून घ्यावे,असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रशासनाला दिले होते. एसटी महामंडळाने स्वच्छता मोहीम राबविली होती . त्यामुळे यंदाही एसटी प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.  

एसटी गळती थांबणार का

एसटीच्या मुंबई आगारात २७० एसटी बस आहेत. गेल्यावर्षी काही बस गळत असल्याच्या  तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. यंदा बसमध्ये पावसाळ्यापूर्वी पोस्टिंग लावण्यात येत आहे. त्यामुळे  यंदा एसटीमधून पाणी गळती होणार नाही असा दावा प्रशासनांकडून केला जात आहे. 

मुंबईकरांसाठी खड्डे ठरतायेत डोकेदुखी

पावसाळा येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. एक दोन पावसानंतर मुंबईतील रस्त्यांची चाळण होते . हे खड्डे  मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरतात . रस्त्यावरील त्यामुळे खड्डा चुकवताना होणारे अपघात, वाहतूक कोंडी अशा समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावे लागत आहेत. 

हे रस्ते धोकादायक

वांद्रे वरळी सीलिंक, पश्चिम पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन पनवेल महामार्ग, वडाळा-सीएसएमटी मार्ग, विक्रोळीतील गोदरेज घोडा गेट सिग्नल, मुलुंडकडून येताना ऐरोली पुलाआधीचा भाग, मानखुर्द जकात नाका, नेस्कोसमोर आरे जंक्शन, सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील छेडानगर.

ब्लॅक स्पाॅटमुळे सर्वाधिक मृत्यू

मुंबईतील ५८ ब्लॅकस्पाॅटपैकी अर्ध्याहून अधिक हे पूर्व द्रुतगती महामार्गावर आहेत. ठाण्यापासून ते दक्षिण मुंबईपर्यंतच्या मार्गावर ब्लॅकस्पाॅटमुळे अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. त्यात वेगमर्यादा ओलांडणे, लेन कटिंग, वाहतुकीचे नियम मोडणे असे प्रकार होत असल्याने अपघाती मृत्यू वाढत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील आकडेवारी

वर्ष - अपघात - मृत्यू - जखमी

२०२२---१८९५---३७१

२०२३---१४७४----२८३

मुंबईत असलेल्या ब्लॅक स्पाॅटचा अभ्यास करून कारणे शोधण्यात आली. यामध्ये  रस्तेबांधणीतील दोष, अतिवेगाने वाहन चालवणे, वाहतूक नियमांच्या जनजागृतीचा अभाव  या कारणांनुसार उपाययोजना करण्यात आल्या. त्यासाठी संबंधित यंत्रणांना पाठपुरावा करण्यात आला. 

- एम रामकुमार , अप्पर पोलीस आयुक्त , वाहतूक 

वेळेवर सर्व्हिसिंग करा

पावसाळ्यात वेळेवर सर्व्हिसिंग करावी, दृश्यमानता कमी असल्याने हेडलाईट, टेललाईट आणि इंडिकेटर तपासून घ्यावे , वायपर तपासावे , गाडीचे ब्रेक नीट असणं गरजेचे आहे. टायर हवामधील दाब, ट्रेड डेप्थ व स्टेपनी तपासावे . पुढील वाहन व स्वत:चे वाहन यात योग्य अंतर असावे.

-भरत कळसकर , उपायुक्त ,रस्ता सुरक्षा कक्ष , महाराष्ट्र राज्य

वाहन हळू चालवा

पावसाळ्यात अनेकदा ब्रेक स्किड होतात. त्यामुळे वाहन हळू चालवावे . टायर उत्तम स्थितीत असणे खूप जास्त गरजेचे आहे. अन्यथा ब्रेक दाबल्यानंतर मोटार घसरते. त्यामुळे टायर खराब असल्यास अपघाताचा धोका वाढतो. पावसाळ्यात शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात जास्त अपघात होतात, त्यामुळे वाहन चालकांनी काळजी घ्यावी.

-डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूक तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com