

Controversy deepens as Sahar Shaikh goes unreachable after viral social media message
Esakal
Mumbra corporator Sahar Shaikh: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्र्यातील प्रभाग ३० मधून विजयी झालेली नगरसेविका सहर शेख आता अडचणीत सापडली आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं नगरसेवक पद धोक्यात आलं आहे. यानंतर सहर शेखसह तिचे वडील युनुस शेख हे दोघेही नॉट रिचेबल आहेत. सहरने सोशल मीडियावर आपल्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं म्हणत प्रतिक्रिया दिलीय. पण त्यानंतर तिने माध्यमांना थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या दोघेही नॉट रिचेबल असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.