संमेलनाच्या आयोजकांनी पुन्हा छापल्या निमंत्रण पत्रिका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - साहित्य संमेलनापासून राजकारण्यांना दूर ठेवले पाहिजे, असे मत 1975 मध्ये कराड येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनापासून मांडले जात आहे. तरीही संमेलनाच्या मंडपातील राजकारण्यांची उपस्थिती मात्र कमी झालेली नाही. यंदा डोंबिवलीत होणाऱ्या संमेलनात राजकीय नेत्यांची नावे प्रोटोकॉलप्रमाणे न छापल्यामुळे आयोजक आगरी यूथ फोरमवर निमंत्रण पत्रिका पुन्हा छापण्याची वेळ आली आणि यंदाही साहित्य संमेलनाला वादाचे गालबोट लागले. 

डोंबिवलीत 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नाव पाचव्या क्रमांकावर छापण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब निदर्शनास आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल पवार यांचे नाव घालून पत्रिका पुन्हा छापण्यात आल्या. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांनी सांगितले, की आम्ही दिलेली नावे छपाई करणाऱ्यांनी सोयीनुसार छापली. त्यामुळे त्यात अनेक चुका राहिल्या होत्या. त्या दुरुस्त करून पुन्हा पत्रिका छापण्यात आल्या. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पद "कार्याध्यक्ष' असे छापल्याने तसेच पत्रिकेत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची नावे नसल्याने महापौर राजेंद्र देवळेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. 
शिवसेनेचे कल्याणमधील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावापुढील "डॉक्‍टर' हा उल्लेख करायचा राहून गेला होता. पक्षाचे विधान परिषदेतील सदस्य रवींद्र फाटक यांचे आडनाव चुकीचे छापण्यात आले होते. त्यामुळे वाद निर्माण होऊन पत्रिका पुन्हा छापण्याची पाळी आली.

Web Title: sahitya sammelan invitation card