
Saif Ali Khan Attack Marathi News : बॉलिवूड अभिनेता सैफअली खान याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकी घटना काय घडली? कशामुळं घडली? यावर त्यांनी भाष्य केलं आहे.
पत्रकारांनी सैफअली खानवरील हल्ल्याबाबत विचारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, "या घटनेबाबत पोलिसांनी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की, हा कशा प्रकारचा हल्ला आहे. यामागं काय आहे? कोणत्या हेतून हे झालं आहे? याची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे.