दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा : सायरा बानू

Saira Banu says Dilip Kumars condition has improved
Saira Banu says Dilip Kumars condition has improved

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती दिलीपकुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिली. दिलीपकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली होती.  

दिलीपकुमार यांची प्रकृती खालावल्याने बुधवारी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. प्रकृतीबाबत त्यांच्या आप्तजणांकडून विचारपूस करण्यात येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त येताच त्यांच्या चाहतावर्गाकडून प्रार्थना करण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे नुकतेच सांगितले गेले. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीने दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, दिलीपकुमार यांच्या शरीरात न्यूमोनियाची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे. ते लवकरच बरे होतील. मात्र, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com