सट्टेबाजी प्रकरणात साजीद खानचेही नाव 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

ठाणे - बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक साजीद खान हादेखील सट्टेबाज सोनू जालान याच्याकडे सात वर्षांपूर्वी सट्टा खेळल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे; मात्र हे प्रकरण जुने असल्याने गरज वाटल्यास साजीद खान यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच अभिनेता अरबाझ खान यांचीही ठाणे पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यामुळे सोनू जालान याचे बॉलिवूडशी किती जवळचे संबंध होते हे उघड झाले आहे. निवृत्त पोलिस अधिकारी सुहेल बुद्धा यांचा भाऊ समीर बुद्धा यांचेही या प्रकरणात नाव समोर आले आहे.

ठाणे - बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक साजीद खान हादेखील सट्टेबाज सोनू जालान याच्याकडे सात वर्षांपूर्वी सट्टा खेळल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे; मात्र हे प्रकरण जुने असल्याने गरज वाटल्यास साजीद खान यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच अभिनेता अरबाझ खान यांचीही ठाणे पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यामुळे सोनू जालान याचे बॉलिवूडशी किती जवळचे संबंध होते हे उघड झाले आहे. निवृत्त पोलिस अधिकारी सुहेल बुद्धा यांचा भाऊ समीर बुद्धा यांचेही या प्रकरणात नाव समोर आले आहे. त्यांना मंगळवारी ठाणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. 

Web Title: Sajid Khan name in the betting case