Sakal Chitrakala Spardha 2023 : पारा घसरला, पण चित्रकला स्पर्धेत उत्साहाचा उच्चांक ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Chitrakala Spardha 2023 school student participation mumbai

Sakal Chitrakala Spardha 2023 : पारा घसरला, पण चित्रकला स्पर्धेत उत्साहाचा उच्चांक !

मुंबई : मुंबईतील सकाळच्या वेळेतील बोचणार थंडी, सुट्टीचा रविवारचा दिवस अन् शाळा अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही सकाळ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न अन् त्यासाठीचा चित्राच्या रूपातला प्रतिसाद हीच प्रतिकया पूरक होती.

घड्याळ्याच्या काट्यावर चित्र पूर्ण करण्याची स्पर्धा एकीकडे करतानाच विक्रोळीतील कन्नमवार नगरचे विकास हायस्कूल मुलांच्या गर्दीने गजबजुन गेले होते. प्राथमिक तसेच माध्यमिक गटात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी आपल्या कार्टून्स कॅरॅक्टर्समध्ये डोरेमॉनपासून ते मोटू पतलूच्या चित्रांसाठी एकीकडे पसंती दिली. तर काही विद्यार्थ्यांनी जागतिक कोरोना महामारीच्या निमित्ताने मास्क आणि मी यासारखी संकल्पना साकारली. तर काही मुलांनी आपण भेट दिलेले प्राणिसंग्रहालय साकारले. तर काही विद्यार्थ्यांनी सर्वांचाच आवडता असणारा खेळ म्हणजे क्रिकेटच्या स्टेडिअमचे चित्र साकारले.

मोठ्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय संवेदनशील असा विचार करत आपल्या चित्राची मांडणी केल्याचेही यावेळी पहायला मिळाले. तर काही विद्यार्थ्यांनी मर्यादित रंगसंगतीचा वापर करत आकर्षक अशा चित्रांचे रेखाटन केले. अनेक विद्यार्थ्यांनी तर आपल्या चित्रात काही वैविध्यपूर्ण असा संदेश देता येईल यासाठीचाही कटाक्ष ठेवला. तर दुसरीकडे बच्चेकंपनीने आपल्या आवडत्या बर्थ डे पार्टीमधील केकच्या चित्राचाही मनसोक्त असा आनंद लुटला. अनेक विद्यार्थ्यांनी केकसोबतच फुग्यांच्या आणि पार्टी डेकोरेशनच्या मटेरिअलने चित्रही सजवले.

मोठ्या विद्यार्थ्यांसाठी दीड तासांचा वेळ होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय मनापासून अशा पद्धतीने चित्र साकारले. तर छोट्या वयोगटाच्या अनेक विद्यार्थ्यांनी एक तासांचा मर्यादित वेळ असूनही चित्र काढण्यासाठी बराचसा वेळ दिला. दिलेल्या वेळेनंतरही अनेक विद्यार्थी आपले चित्र पूर्ण करण्यासाठी मग्न होते. आपले चित्र वेगळे असावे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने अतिशय मेहनतीचे चित्रांची मांडणी केली.