CM ekanath shinde: ओबीसी विभागाच्या योजनांसाठी स्वतंत्र कक्ष, मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

CM ekanath shinde: या कक्षात मंत्रालयातील सात अधिकारी काम करतील, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.
CM ekanath shinde: ओबीसी विभागाच्या योजनांसाठी स्वतंत्र कक्ष, मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

ओबीसी विभागाच्या विविध योजना कार्यक्षमपणे राबविण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.

ओबीसी विभागात प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची त्याचबरोबर निधीची कमतरता अशा अनेक बाबींमुळे योजनांची फरपट झाल्याचे वृत्त ‘सकाळ’ ने प्रसिद्ध केले होते. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाच्या उन्नतीसाठी शक्तीप्रदत्त समिती व आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट नेमला होता.

या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात अाला आहे. तांडा वस्ती सुधार योजना, अहिल्यादेवी होळकर योजना, यशवंतराव चव्हाण वसाहतमुक्त योजना, या योजना दारिद्र्य रेषेखालील ओबीसी नागरिकांना घरकुल देणाऱ्या आहेत. मात्र, जिल्हास्तरावर अधिकारीच नसल्याने या योजनांना आपले उद्दिष्ट गाठता आले नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते.

ओबीसी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने वेळोवेळी आढावा घेऊन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे, विभागातील कल्याणकारी योजनांशी संबंधित कार्यासन तसेच विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी समन्वय, प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केल्यानंतर विविध मंत्रालयीन विभागात नियमित पाठपुरावा करून प्रस्ताव मंजूर होऊन आदेश प्रसिद्ध होईपर्यंतच्या प्रक्रियेत संबंधित अधिकाऱ्यांना मदत करणे, योजनेची सद्य:स्थिती सांगण्यासाठी विभागात एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. या कक्षात मंत्रालयातील सात अधिकारी काम करतील, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com