मुंबई - अनुसूचित जातीत असूनही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि रोजगार, नोकरीच्या स्तरावर अत्यंत मागास राहिलेल्या मांग, मातंग समाजाचा महामोर्चा मुंबईत २० रोजी धडकणार आहे.
यासाठी सकल मातंग समाजाच्या नावाने तब्बल ५० हून अधिक संघटना एका बॅनरखाली आल्या असून यासाठी प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर बैठका आणि त्यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती संघटनांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली.