मुंबई : साकिनाक्यात 'लिव्ह इन पार्टनर'ने केला महिलेचा खून

murder
murdersakal media

मुंबई : मुंबईतील (Mumbai) साकिनाक्यात धक्कादायक घटना नुकतीच घडलीय. लिव्ह इन रिलेशनशिप (live in relationship) मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने २९ वर्षीय महिलेचा खून (woman murder) केला आहे. मनीषा जाधव असं या पीडित महिलेचं नाव आहे. याप्रकरणी आरोपी राजू नाले (४२) याला साकिनाका पोलिसांनी (sakinaka police) अटक केलीय. साकिनाका येथील संघर्ष नगरमध्ये असलेल्या म्हाडा फ्लॅटमध्ये ही घटना गुरुवारी घडली. (Sakinaka police arrested accused raju nale in live in relationship partner murder crime)

murder
नवी मुंबई : स्पा ओनरकडून खंडणी मागणाऱ्या तीन पत्रकारांवर गुन्हा दाखल

आरोपी नालेने त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मनीषावर अनेक वार केले. त्यानंतर ती जबर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. मनीषाचा खून केल्यानंतर आरोपी नाले पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र साकिनाका पोलिसांनी वेळीच त्याला पकडले आणि अटक केली. "मनिषाचे दुसऱ्या कुणी व्यक्तीबरोबर संबंध आहेत असा संशय आरोपी नालेला होता. मागिल तिन वर्षांपासून ते दोघे एकत्र राहत होते. दोघांचंही लिव्ह इन रिलेशनशिपच्या आधी दोन वेळा लग्न झालं होतं. आधीच्या पार्टनरसोबत घटस्फोट न घेताच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिप सुरु केलं." अशी माहिती पोलिसांनी दिली.

तसंच साकिनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, साकिनाका संघर्ष नगरमध्ये म्हाडात राहणाऱ्या नागरिकांनी पीडित महिलेच्या किंचाळ्या ऐकल्यावर पोलिसांना फोनवरुन कळवले. त्यानंतर पोलीसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. आरोपी नाले रक्तात भिजलेले कपडे बदलून तेथून पळ काढण्याचा प्रयत्नात होता. मात्र पळून जाण्याआधीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com