esakal | Sakinaka rape case: 'भय इथले संपत नाही…', चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra-Wagh

Sakinaka rape case: 'भय इथले संपत नाही…', चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: महिलांच्या प्रश्नावर (women issues) सातत्याने आवाज उठवणाऱ्या भाजपाच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ (chitra wagh) यांनी साकीनाका बलात्कार घटनेवर (sakinaka rape case) संताप व्यक्त केला आहे. महिला सुरक्षेच्या मुद्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. "महाराष्ट्रात महिला आणि मुलीवर अत्याचाराचं सत्र थांबत नाहीये. परवा चौदा जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. कालही अपल्वयीन मुलीवर बलात्कार झाला आणि आज मुंबईत साकीनाक्यामध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी (police) एक आरोपीला पकडल्याची माहिती दिली आहे. पण राजावाडीच्या डॉक्टरांनी जे सांगितलं, ते जास्त गंभीर आहे" असं चित्रा वाघ म्हणाल्या.

"दिल्लीच्या निर्भयासारखं हे प्रकरण आहे. नक्कीच यात एकपेक्षा जास्त गुन्हेगार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी एकाला अटक केली. पण मला खात्री आहे, पुढच्या काही दिवसात अजून नावं पुढे येतील" असं चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा: Sakinaka rape case: कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का?, फडणवीसांचा सवाल

"राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कुठे महिलांची बोटं छाटली जात आहेत. एफआयआर होत नाहीय. त्यामुळे या सरकारला सुबुद्धी द्यावी, असं पहिल्याच दिवशी गणरायाला साकडं आहे. महिला अत्याचारावरुन भाषण करण्याऐवजी, जे कायदे बनवलेत त्याची तातडीने अंमलबजावणी करावी" असे चित्रा वाघ म्हणाल्या.

हेही वाचा: राष्ट्रवादीत अस्वस्थता! अहीरकर, पवार गॅसवर; विश्वस्त कोण?

साकीनाका बलात्कार प्रकरण

मुंबापुरीत महिलांच्या सुरक्षिततेबद्दल (women security) गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साकीनाका भागात (Sakinaka area) टेम्पोमध्ये एका महिलेवर बलात्कार (rape on women) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडित महिलेची प्रकृती गंभीर (women serious condition) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहन चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अत्याचार केल्यानंतर रॉडसारख्या वस्तुने महिलेला जखमी केले आहे.

loading image
go to top