esakal | साकिनाका येथे तरुणीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक | sakinaka
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

साकिनाका येथे तरुणीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : साकिनाका (sakinaka) येथील एका तरुणीच्या विनयभंगप्रकरणी (women molestation) एकास कर्नाटकमधून (culprit arrested) अटक करण्यात आली. अल्ताफ हुसैन अब्दुल हुसैन तालुकदार असे आरोपीचे नाव आहे. साकीनाका पोलिसांच्या (sakinaka police) विशेष पथकाने आरोपीला अंधेरी स्थानिक न्यायालयात (andheri court) हजर केले असता त्याची जामिनावर (bail) सुटका केली.

हेही वाचा: नवी मुंबईत सिडकोने केलेले काम कौतुकास्पद; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

तक्रारदार तरुणी ही तिच्या आईसोबत साकीनाका परिसरात राहते. ती घाटकोपर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. २७ फेब्रुवारी रोजी एका अज्ञाताने पीडितेच्या मोबाईलवर फोन केला. त्या वेळी आरोपीने पीडितेशी अश्‍लील संभाषण केले. त्यामुळे भयभीत होऊन पीडितने सारा प्रकार आईला सांगितला. त्याआधीही तालुकदार याने पीडितेच्या आईशी अश्‍लील संभाषण करून तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे दोघींनी मिळून साकीनाका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीला कर्नाटक येथील अमृतपल्ली परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

loading image
go to top