हुंड्यासाठी दोन सुनांची दीड लाखात विक्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

मुंबई - हुंड्यासाठी दोन सुनांचा शारीरिक, मानसिक छळ करून त्यांना राजस्थानमध्ये दीड लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील विरारमध्ये उघडकीस आला आहे. या दोन्ही सुना सख्ख्या बहिणी आहेत. याप्रकरणी या दोघींच्या पतींसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

मुंबई - हुंड्यासाठी दोन सुनांचा शारीरिक, मानसिक छळ करून त्यांना राजस्थानमध्ये दीड लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील विरारमध्ये उघडकीस आला आहे. या दोन्ही सुना सख्ख्या बहिणी आहेत. याप्रकरणी या दोघींच्या पतींसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

विरारमधील संजय आणि वरुण रावळ या दोघा भावांचे पीडित दोन सख्ख्या बहिणींशी २०१५ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर रावळ कुटुंबीयांनी या दोन्ही बहिणींचा हुंड्यासाठी छळ करण्यास सुरवात केली. अडीच वर्षे या पीडित बहिणींचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांच्याकडून १० लाखांहून अधिक हुंडा उकळण्यात आला. त्यानंतरही चार लाखांची मागणी करण्यात आली. मात्र ती त्यांनी पूर्ण न केल्याने पीडित बहिणींना राजस्थानमधील विरवाडा येथे नेऊन जिवंत जाळण्याची धमकी देत त्यांच्यावर अत्याचार केले. नंतर त्यांनी या दोघींची एकाला चक्क दीड लाख रुपयांत विक्री केली.

सुटकेचा थरार...
३० ऑगस्ट २०१८ ला रावळ कुटुंबीय दोन्ही सुनांना घेऊन राजस्थान येथील त्यांच्या मूळ गावी गेले. १ ते ९ सप्टेंबरपर्यंत त्यांना जनापूर येथे ठेवल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीसोबत दोघींना विरारला पाठवण्यात आले. वसईला गाडी थांबल्यानंतर त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला; मात्र एकाने त्यांना उतरण्यास विरोध केला. ‘मी तुमच्या सासऱ्याला दीड लाख रुपये दिले आहेत. ते कसे वसूल करतो पाहाच,’ अशी धमकीही त्याने दिली. हा प्रकार रेल्वेतील एका गुजराथी आणि दाक्षिणात्य कुटुंबाच्या लक्षात आला. त्यांनी या दोघींना वसईत उतरण्यासाठी मदत केली.

Web Title: Sales of two women for dowry Crime