methice
methice

अलिशान कारमधून महागडे अंमली पदार्थ जप्त, ड्रग्स विक्रीतील मोठा 'प्लेअर' अटकेत

मुंबई : लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन अमली पदार्थांची विक्री केल्याच्या प्रकरणात मालाड येथील तरुणाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. त्याच्या कारमधून 35 लाखांचे 340 ग्रॅम मेथाअॅम्फेटामाईन म्हणजे आईस जप्त करण्यात आला.

मालाड पश्चिम येथील एका उच्चभ्रू गृहसंकुलात पार्क केलेल्या आलिशान कारमध्ये महागडे अंमली पदार्थ लपवण्यात आल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार कारचा मालक रोहन गावन्स याच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली. त्यावेळी 340 ग्रॅम मेथाअॅम्फेटामाईन सापडले. कारमधील अतिरिक्त टायरमध्ये चोरकप्पा बनवून ड्रग्ज लपवण्यात आले होते. त्यानंतर गावन्स याला अटक करण्यात आली.लॉकडाऊन असतानाही गावन्स नियमित घराबाहेर पडून अंमली पदार्थांचे वितरण करत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले. संचारबंदीचा गैरफायदा घेऊन तो अमली पदार्थांची विक्री तिप्पट ते चौपट रकमेला करत असल्याचे उघड झाले. डीआरआयने रोहन गावन्स याच्या महाड येथील कारखान्यावरही छापा टाकून अंमली पदार्थ बनवण्याचा कच्चा माल जप्त केला. 

मॅच बेटिंग व फिक्सिंग रॅकेटशीही गावन्स संबंधित असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. परंतु, तसा कोणताही पुरावा अद्याप हाती लागलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलमांखाली अटक करण्यात आलेल्या गावन्स याला न्यायालयाने 13 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

तीन वर्षांपूर्वीही अटक 
रोहन गावन्स याला 18 जुलै 2017 रोजी 25 किलो मेफेड्रॉनच्या तस्करीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबई विमानतळावरून अटक केली होती. परदेशात पलायनाच्या तयारीत असताना त्याला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर 17 महिने तुरुंगात राहिल्यावर तो जामिनावर बाहेर आला होता.

मोठा ’प्लेयर’
रोहन गावन्स हा महाराष्ट्र व गोव्यातील तस्करांच्या जाळ्यातील मोठा ’प्लेयर’ असल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या विरोधात मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थविरोधी पथक, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक व डीआरआयमध्ये गुन्हे दाखल आहेत. बँक खात्यातील व्यवहार व मोबाईलवरून केलेल्या संपर्कांवरून त्याचे साथीदार व ग्राहकांची माहिती घेतली जात आहे.

Sales of unwanted things during lockdown cops caught car from mumbai

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com