
पुण्याच्या शार्पशूटरनेच सलमान खानला धमकी दिली? चौकशी सुरू
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील, लेखक सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचा संबंध पंजाबमधला गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येशी जोडला जात होता. त्याच प्रकरणात काल एका आरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीचीही सलमान खान धमकी प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. (Salman Khan Death Threat Case)
हेही वाचा: सलीम आणि सलमान खान पितापुत्राला जीवे मारण्याची धमकी!
काही दिवसांपूर्वी सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यात आढळून आले. सौरभ महाकाल आणि संतोष जाधव या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. संतोष जाधव पुण्यातल्या आंबेगावचा रहिवासी असून त्याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. तो शार्पशूटर असून सलमान खान धमकी प्रकरणात देखील संतोष जाधवची चौकशी होणार आहे.
हेही वाचा: सलमान खान धमकी प्रकरण : सौरभ महाकाळची मुंबई पोलिसांकडून चौकशी
सलमान खान केस प्रकरणी याप्रकरणी टीम दिल्ली आणि राजस्थान मध्ये चौकशी करत आहेत. दुसऱ्या बाजूला या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोईची देखील चौकशी चालू आहे. तर सौरभ महाकालचीही याच प्रकरणात चौकशी सुरू आहे.
Web Title: Salman Khan Death Threat Siddhu Moosewala Murder Pune Sharp Shooter
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..