सलमानच्या चाहत्यांचे मोबाईल चोरणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मुंबई - काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानची जामिनावर सुटका झाल्यावर त्याच्या चाहत्यांनी वांद्रे येथील त्याचे निवासस्थान असलेल्या गॅलेक्‍सी अपार्टमेंटजवळ शनिवारी (ता. 7) जल्लोष केला. त्यादरम्यान चाहत्यांच्या मोबाईलची चोरी करणाऱ्यास वांद्रे पोलिसांनी अटक केली. विशाल रामलखन यादव असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले 13 मोबाईल जप्त केले आहेत. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले. सलमानची जामिनावर सुटका झाल्याचे समजताच शनिवारी दुपारपासूनच त्याच्या चाहत्यांनी गॅलेक्‍सी अपार्टमेंटबाहेर गर्दी केली होती. सलमान रात्री तेथे आला.

मुंबई - काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानची जामिनावर सुटका झाल्यावर त्याच्या चाहत्यांनी वांद्रे येथील त्याचे निवासस्थान असलेल्या गॅलेक्‍सी अपार्टमेंटजवळ शनिवारी (ता. 7) जल्लोष केला. त्यादरम्यान चाहत्यांच्या मोबाईलची चोरी करणाऱ्यास वांद्रे पोलिसांनी अटक केली. विशाल रामलखन यादव असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले 13 मोबाईल जप्त केले आहेत. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले. सलमानची जामिनावर सुटका झाल्याचे समजताच शनिवारी दुपारपासूनच त्याच्या चाहत्यांनी गॅलेक्‍सी अपार्टमेंटबाहेर गर्दी केली होती. सलमान रात्री तेथे आला. त्या वेळी गर्दीचा फायदा उठवत विशालने 13 मोबाईल चोरून पोबारा केला. 

Web Title: Salmans fans arrested mobile thief