अखेर तीन महिन्यानंतर मुंबईत सलून झाले सुरु; अनेक ठिकाणी नागरिकांच्या लागल्या रांगा..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

तब्बल तीन महिन्यानंतर मुंबईत सलून सुरू झालेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आजपासून राज्यासह मुंबईत सलून सशर्त सुरु झाली. तीन महिने सलून बंद राहिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं.

मुंबई- तब्बल तीन महिन्यानंतर मुंबईत सलून सुरू झालेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आजपासून राज्यासह मुंबईत सलून सशर्त सुरु झाली. तीन महिने सलून बंद राहिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं. कंटेनमेंट झोनबाहेरची सलून सुरु करण्यात आली आहेत. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचे पालन करतानाच ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करूनच त्यांना सलूनमध्ये प्रवेश दिला जात आहे. आज सलून सुरू होणार म्हणून सलून मालकांनी सलूनची साफसफाई करून निर्जंतुकीकरण केलं आहे. 

सलूनचे मालक शाहिद हुसेन म्हणाले, "आम्ही आमच्या दुकानात प्रवेश करतो तेव्हा आम्ही ग्राहकांचे तापमान तपासतो आणि त्यांना हँड सॅनिटायझर्स देत आहोत. आम्ही प्रत्येक ग्राहकांसाठी नवीन टॉवेल प्रदान करत आहोत. सलूनमधील कर्मचाऱ्यांनी मास्क आणि गोल्व्हज सारख्या पीपीई किट घालूनच काम करत आहेत. आजपासून सलून सुरू झाल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सलून मालकांनीही बरीच खबरदारी घेतल्याचं दिसून येतं.

हेही वाचा: धक्कादायक! बँकेने गोठवले 'या' महाविद्यालयाचे खाते; प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात अडचण..

यूज आणि थ्रो अशीच उत्पादने वापरली जात आहेत. अपॉईटन्मेंट घेतल्याशिवाय आम्ही कोणत्याही ग्राहकांना सेवा देत नाही आहोत. आम्ही जास्तीत जास्त फक्त चार ते पाच कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज अनेक सलूनमध्ये तिथले कर्मचारी तोंडाला मास्क, अॅप्रन आणि हातात ग्लोव्हज घालून ग्राहकांची कटिंग करताना दिसले.

सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं म्हणून अनेक सलून बाहेर ग्राहकांना ठरावीक अंतरावर बसण्याची व्यवस्था करण्यात आलीय. तब्बल तीन महिन्यानंतर सलून सुरू झाल्याने कटिंग करण्यासाठी अनेक सलूनबाहेर ग्राहकांची गर्दी दिसली. तंसंच ज्या ग्राहकांना सर्दी, ताप, खोकला असेल अशा ग्राहकांची कटिंग केली जात नाही.  

हेही वाचा: नालासोपरा हादरलं! तीन मुलांची हत्या करुन पित्यानं उचललं हे पाऊल...

यावेळी केशकर्तन, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडींग अशा सेवा देता येणार आहेत. मात्र दाढी, मसाज, फेशियल किंवा त्वचेशी निगडित सेवा देण्यास तूर्तास मनाई आहे.  दुकानात खुर्च्या, रिकाम्या जागा, फरशीसह इतर जागा दर 2 तासांनी निर्जंतुक करणं आवश्यक आहे. ग्राहकांसाठी केवळ एकदाच वापरात येणारे डिस्पोजल टॉवेल, नॅपकिन बंधनकारक करण्यात आलेत.

salon opned in mumbai after 3 months 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salon opned in mumbai after 3 months