सलुन तर सुरू केले; मात्र कारागिरांची अजूनही वनवा...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 30 जून 2020

मुंबईसह उपनगरात सलून खुली झाली आहेत. मात्र अनेक सलून मालकांना कारागीरांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. त्याचबरोबर काही सलून चालकांनी अद्याप याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला नसल्याचे सांगितले.

 

मुंबई ः मुंबईसह उपनगरात सलून खुली झाली आहेत. मात्र अनेक सलून मालकांना कारागीरांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. त्याचबरोबर काही सलून चालकांनी अद्याप याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला नसल्याचे सांगितले.

मुंबईत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच; तब्बल 'इतकी' वाहनं केली जप्त..

गेल्या आठवड्यात सलून सुरु करण्याबाबतची घोषणा राज्यातील विविध मंत्र्यांनी केली आहे. पुनश्च हरिओमच्या चौथ्या टप्प्यात सलून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. अर्थात त्यांनाही मर्यादीत सेवा सुरु ठेवण्यास सांगितले आहे. थेट त्वचेला स्पर्श करणे भाग पडत असलेले कोणतेही काम करण्यास प्रतिबंध आहे. 
मुंबई उपनगरातील काही सलून मालकांनी क्षमतेनुसार काम सुरु झाले नसल्याचे सांगितले. काही सलून मालकांनी काही गिऱ्हाईक पूर्वीच्या कारागीरांबाबत विचारतात. आम्ही गावाला गेलेल्या कारागीरांशी संपर्क साधला, पण त्यातील काहींनी मुंबईत येणे अजून सुरक्षित वाटत नसल्याचे सांगितले, तर काहींनी ट्रेनने कसे येणार असे विचारले आहे. चांगले कारागीर नसल्यामुळे काहींनी आपले सलून बंदच ठेवण्यास पसंती दिली आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात वीस लाख सलून आहेत, त्यात सरासरी 80 लाख लोक काम करतात. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सलून सुरु झाल्यामुळे काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. मात्र सलून सुरु करण्याबाबतचा आदेश आमच्याकडे आला नसल्याचे महापालिकेतील आधिकारी सांगतात. आता याबाबतचा अधिकृत आदेश न निघाल्यामुळे दुकान सुरु झाल्याबाबतचा आदेशही कुठे उपलब्ध नाही. 

वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

रविवारी सलून सुरु झाले, पण अपेक्षित प्रतिसाद लाभला नसल्याची तक्रारही काही करीत आहेत. काही दुकानदारांनी निर्जतुकीकरणासाठी दुकानाच्या वेळा बदलल्या आहेत, नियमीत ग्राहक विचारणा करतात. सुरक्षा उपाययोजनांबाबत सांगतो, पण जेवढी विचारणा होते, तेवढे ग्राहक येत नसल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Salons have opened in suburbs including Mumbai. However, many salon owners are feeling the lack of workers

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: