समुद्राचे खारे पाणी होणार गोडे; पाणीकपातीची चिंता आता विसरा

समीर सुर्वे
Tuesday, 24 November 2020

मुंबईत मनोरी येथे समुद्राचे 200 दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईत मनोरी येथे समुद्राचे 200 दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया करून गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 1800 कोटी रुपये खर्च होणार असून एक हजार लिटर पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी साधारण 30 रुपयांपर्यंत खर्च येण्याचा अंदाज आहे. तलावातील पाणी शुध्द करुन ते मुंबईत पोहचविण्यासाठी महापालिका 1 हजार लिटर पाण्यासाठी 16-17 रुपये खर्च करते.

महत्वाची बातमी : राजेश टोपे म्हणालेत, "दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून 'मोठा' निर्णय घेणार"; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज या प्रकल्पाचा आढावा घेऊन पुढील प्रक्रीया सुरु करण्याचेे निर्देश पालिकेला दिले आहेत. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मनोरी येथे हा प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. मनोरीयेथे सरकारचा भुखंड असून तेथे रस्तेही आहेत. या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्याबाबत विचार सुरु आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरास उपस्थीत होते.

महत्वाची बातमी :  भाजपला पुन्हा मोठा दणका; उद्या आणखी एक नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

मनोरी येथे 25 ते 30 एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून 200 एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असून प्रकल्पासाठी आंदाजे 1600 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. निर्मिती खर्च 3 ते 4 पैसे लिटर इतका खर्च येणार असल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणात सांगितले.

पावसाळ्यापुर्वीची पाणी कपात टळेल 

पावसाला विलंब झाल्यास मे किंवा जूनमध्ये मुंबईत 10-15 टक्के पाणी कपात करावी लागते. समुद्राचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाल्यास ही कपात करण्याची गरज भासणार नाही. काही देशांमध्ये असे प्रकल्प उभारले जात आहेत. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे. मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. तसेच पायाभूत सुविधाही सहज उपलब्ध होऊ शकतात. मानोरी येथे शासनाचा भूखंडही उपलब्ध आहे तसेच रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विना व्यत्यय पूर्ण होऊन कपातीविना नियमित पाणी पुरवठा होणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमुद केले.

( संपादन - सुमित बागुल )

salty sea water to be converted into drinkable sweet water 200 mld plant proposed in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salty sea water to be converted into drinkable sweet water 200 mld plant proposed in mumbai