
समर्थ रामदास स्वामी यांचे कार्य देशव्यापी होते. त्यांनी भारताबाहेर जाऊन आपल्या पंथाची आणि मठांची स्थापना केली होती. वारकरी पंथाला ते वडील संप्रदाय म्हणत.
मुंबई : ‘जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन’ अशी रचना करून अभिजन आणि बहुजनांमध्ये ज्ञानोपासना व्हावी यासाठी पुढाकार घेतलेले संत रामदास स्वामी (Sant Ramdas Swami) हे अनोखे संत होते. भागवत आणि वारकरी परंपरलेला ‘वडील संप्रदाय’ म्हणून त्या संप्रदायाचा कायम आदर राखत मानवी कल्याणासाठी नव्याने विकसित केलेला मराठी मातीतील रामदासी विचारांचा पंथ त्यांनी भारतातच नव्हे, तर आजच्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानपर्यंत (Pakistan) पोहोचवून तिथेही राम, हनुमान आणि आपल्या पंथाच्या मठांची स्थापना करण्याचे मोठे कार्य केले.