सी.ए च्या परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या समिक्षा अग्रवाल हिचा सत्कार

दिनेश गोगी
सोमवार, 23 जुलै 2018

मे महिन्यात झालेल्या सी.ए चा अर्थात सनदी लेखापाल परीक्षेचा निकाल 20 तारखेला जाहीर झाला. त्यामध्ये उल्हासनगरातील समिक्षा सुभाष अग्रवाल हिने महाराष्ट्रात अव्वल व भारतात तिसरा क्रमांक पटवला आहे. उल्हासनगरसाठी भूषण ठरलेल्या समिक्षा हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गौरव करून शाबासकी दिली आहे.

उल्हासनगर- मे महिन्यात झालेल्या सी.ए चा अर्थात सनदी लेखापाल परीक्षेचा निकाल 20 तारखेला जाहीर झाला. त्यामध्ये उल्हासनगरातील समिक्षा सुभाष अग्रवाल हिने महाराष्ट्रात अव्वल व भारतात तिसरा क्रमांक पटवला आहे. उल्हासनगरसाठी भूषण ठरलेल्या समिक्षा हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गौरव करून शाबासकी दिली आहे.

समिक्षा ही सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश अग्रवाल यांचे भाऊ सुभाष अग्रवाल यांची मुलगी आहे. तिचे वडील देखील बांधकाम क्षेत्राशी निगडित आहेत. सी.ए च्या परीक्षेत सुरतचा प्रित शहा हा भारतात पहिल्या क्रमांकावर आला असून बंगलोरचा अभिषेक नागराज याने दुसरा क्रमांक गाठला आहे. देशात तिसऱ्या क्रमांकावर व महाराष्ट्रात अव्वल येऊन उल्हासनगरचे नावलौकिक करणारी समिक्षा हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या प्रदेश सचिव उर्मिला तांबे, शहराध्यक्ष बंडू देशमुख, उपाध्यक्ष सचिन बेंडके, शैलेश पांडव, तन्मेश देशमुख यांनी गौरव करून तिला शाबासकी दिली.

येत्या ऑगस्ट महिन्यात मनसे नेते राजू पाटील तसेच प्रकाश भोईर, अविनाश जाधव, कौस्तुभ देसाई यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे. त्यातही समिक्षा सोबत तिच्या परिवाराचा जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.

Web Title: Samiksha Agarwal honored with the highest marks in CA exams in maharashtra