

Samruddhi Mahamarg
ESakal
मुंबई : मुंबई-नागपूर प्रवास अवघ्या आठ तासात करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उभारलेला ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सध्या सुसाट आहे. या मार्गावरून दररोज सरासरी ५० हजारहून अधिक वाहने ये-जा करत आहेत. तर खुला झाल्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल २ कोटी ९१ लाख वाहनांनी या मार्गाने प्रवास केला आहे. कमी वेळेत जास्त अंतर कापणे शक्य होत असल्याने विदर्भासह नाशिक, शिर्डीसह परिसरातून मोठ्या प्रमाणात कृषी माल मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने येत आहे.