
Mumbai News: समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आमने ते इगतपुरी याचं उद्घाटन तीन आठवड्यांपूर्वीच झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र उद्घाटनाच्या १९ दिवसातच या रस्त्याची दुरावस्था झाल्याचं समोर आलंय. ७६ किमी लांबीच्या या मार्गासाठी २८०० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या मार्गावर खड्डे पडल्यानं आता वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.