
मुंबई : समृद्धी महामार्गाच्या टोल कंत्राटदारांची नियुक्ती लवकरच...
मुंबई : नागपूर-मुंबई धावणाऱ्या वेगवान समृद्धी महामार्गाच्या रस्त्यांवर स्टार्ट टू एन्ड असा टोल बूथ राहणार असून, इतर महामार्गाप्रमाणे जागोजागी टोल देण्याची कटकट नसणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाने टोल कंत्राटदारांची नियुक्ती करण्यासाठी निविदा काढल्या आहे. ज्यामध्ये तीन कंपन्यांपैकी रोड वे सोल्युशन कंपनीचे दर कमी असल्यांना त्यांना टोल वसुलीचे काम दिल्या जाणार असून, लवकरच टोल कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये टोल उभारणी पासून टोल, त्यावरील कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनेच देणार आहे. तर टोल कंत्राटदारांना तब्बल 2025 पर्यंत समृद्धी महामार्गावर टोल वसुली करता येणार आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील 26 टोल नाके उभारण्यात आले आहे. या टोलवर वसूल करण्यात येणारे शुल्क थेट एमएसआरडीसीच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यातून निविदेप्रमाणे ठरवण्यात आलेली टक्यांप्रमाणे रक्कम टोल वसूल कंत्राटदारांना दिल्या जाणार आहे.यामध्ये कल्याण टोल कंपनी, प्रकाश अस्फाल्टीग कंपनी आणि रोड वे सोल्युशन या तीन कंपन्यांपैकी रोड वे सोल्युशन कंपनीचे दर सर्वाधिक कमी असल्याने या कंपनीला टोल वसुलीचे काम मिळणार आहे.
या टोल नाक्यावर मुंबई ते नागपूर प्रवासादरम्यान मोटार, जीप, कार, हलकी लहान वाहनांना 1.73 रुपये प्रती किलोमीटर याप्रमाणे टोल भरावा लागणार आहे. त्याप्रमाणेच तर हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने आणि मिनी बस या वाहनांना 2.79 रुपये प्रति किलोमीटर , बस अथवा ट्रक यांना 5.85 रुपये प्रति किलोमीटर, व्यावसायिक वाहने 6.38 रुपये प्रति किलोमीटर, अवजड बांधकाम यंत्रसामग्री वाहनांना 9.18 रुपये प्रति किलोमीटर तर अति अवजड वाहनांना 11.17 रुपये प्रति किलोमीटर टोल भरावा लागणार असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाने सांगितले आहे.