Sandeep Deshpande : देशपांडे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा; नागरिकांचाही सहभाग

या मोर्चानंतर हल्ल्याप्रकरणी पोलिसांना निवेदनही देण्यात आलं आहे.
Sandeep Deshpande
Sandeep DeshpandeEsakal

Sandeep Deshpande Attack News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये देशपांडे जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.

दादर इथल्या शिवाजी पार्क इथं मॉर्निंग वॉकला गेलेले असताना देशपांडे यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यानंतर देशपांडे यांच्या पायाला दुखापत झाली असून हातही फ्रॅक्चर झाला आहे. या हल्ल्याच्या चौकशीची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

Sandeep Deshpande
Sandeep Deshpande : संदीप देशपांडे हल्ला प्रकरणाचे 'ठाणे' कनेक्शन! मोठी अपडेट आली समोर

या हल्ल्याच्या निषेधार्थ मनसे आणि शिवाजी पार्कमधील दादर फ्रेंड्स गृपच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये संदीप देशपांडे यांच्यासोबत रोज मॉर्निंग वॉक करणारे नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मनसेचे संतोष धुरी, रिटा गुप्ता आणि अखिल चित्रे, नितीन सरदेसाई देखील उपस्थित होते.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी दादर फ्रेंड्स गृपच्या वतीने पोलिसांना निवेदनही देण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com