संदीप दिवे, काजल कॅरमचे विजेते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

काजल कुमारी आणि संदीप दिवे यांनी सुरेश गुप्ते स्मृती राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विजेतेपद जिंकले. ही स्पर्धा ठाण्यातील सी. के. पी. सभागृहात झाली.

मुंबई  : काजल कुमारी आणि संदीप दिवे यांनी सुरेश गुप्ते स्मृती राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विजेतेपद जिंकले. ही स्पर्धा ठाण्यातील सी. के. पी. सभागृहात झाली.

या स्पर्धेत महिलांच्या अंतिम लढतीत काजल कुमारीने मुंबईच्याच नीलम घोडकेचा 23-12, 21-11 असा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मैत्रेयी गोगटेने मिताली पिंपळेला हरवले.

संदीप दिवेने मुंबईच्याच संदीप देवरूखकरला 25-0, 25-10 असे हरवले आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत विश्वविजेत्या प्रशांत मोरेने माजी विश्वविजेत्या योगेश परदेशीला पराजित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sandip dive and kajal kumari won carrom tournament