राष्ट्रवादीला धक्का;  'या' मोठ्या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनेक धक्के लागले आहेत. त्यातच इशान्य मुंबईचे राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय दिना पाटील यांचा पक्ष प्रवेश मातोश्रीवरच होणार होता, परंतु, ते मातोश्रीवर वेळेवर न पोहचल्याने त्यांचा पक्षप्रवेश शिवालय येथे झाला.

मुंबई : विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनेक धक्के लागले आहेत. त्यातच इशान्य मुंबईचे राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय दिना पाटील यांचा पक्ष प्रवेश मातोश्रीवरच होणार होता, परंतु, ते मातोश्रीवर वेळेवर न पोहचल्याने त्यांचा पक्षप्रवेश शिवालय येथे झाला.

संजय दिना पाटील यावेळी म्हणाले की, मला राष्ट्रवादी बाबत कुठलीही नाराजी नाही. शरद पवार यांना काही समस्या झाली तर नक्की जाईल. मी महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेत आलो आहे. सेना प्रवेश करण्यापूर्वी मी शरद पवार यांना भेटलो नाही. लवकरच, शरद पवार यांना ही मी भेटणार आहे. सेना वाढविण्यासाठी मी प्रामाणिक काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

दरम्यान, संजय दिना पाटील यांनी 2009मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तिकीटावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय संपादन केला होता. त्यानंतर अनुक्रमे 2014 आणि 2019 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली होती. परंतु दोन्ही वेळेस त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून पराभव झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Dina patil enters in Shivsena