सतीश मानशिंदे
सतीश मानशिंदे Image source: https://bit.ly/3hSOsKN

सेलिब्रिटी वकिल: आर्यनचा खटला लढवणारे सतीश मानशिंदे कोण आहेत?

बॉलिवूडचे कलाकार सतीश मानशिंदेंना पहिलं प्राधान्य का देतात?
Published on

मुंबई: ड्रग्ज प्रकरणात (drugs case) बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) अटकेत आहे. तुरुंगात असलेल्या मुलाच्या सुटकेसाठी शाहरुखनने आता प्रसिद्ध वकिल सतीश मानशिंदे (Satish Maneshinde) यांची नियुक्ती केली आहे. सतीश मानशिंदे हाय-प्रोफाईल वकिल असून ते आता कोर्टात आर्यन खानचा बचाव करतील. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला काल एका दिवसासाठी आर्यन खानची कस्टडी मिळाली.

मुंबईच्या किनाऱ्याजवळ (Mumbai coast) कॉर्डेलिया क्रूझवर रेव्ह पार्टी (rave party) सुरु असताना शनिवारी NCB ने छापा मारला. या कारवाईतून बॉलिवूड आणि ड्रग्जचं (Drugs) कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. NCB ने कॉर्डेलिया क्रूझवरुन १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, २२ एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि आरोपींकडून १.३३ लाख रोख रक्कम जप्त केली.

सतीश मानशिंदे
धक्कादायक! पुण्यात फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला ठेवलं बाहेर

कोण आहेत सतीश मानशिंदे?

सतीन मानशिंदे ५६ वर्षीय वकिल असून हाय-प्रोफाईल केसेस त्यांच्यासाठी अजिबात नवीन नाहीत. याआधी सुद्धा बॉलिवूडचे टॉपचे स्टार आणि त्यांच्या कुटुंबियांचे खटले सतीश मानशिंदे यांनी लढवले आहेत.

१९९३ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचा खटला लढवणाऱ्या टीमचा ते एक भाग होते. संजय दत्तवर अत्यंत गंभीर आरोप असताना सतीश मानशिंदे यांनी त्याला जामीन मिळवून दिला होता. त्यानंतर देशातील टॉपच्या क्रिमिनल लॉयर्समध्ये त्यांची गणनी सुरु झाली. अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणे त्यांच्याकडे आली.

सतीश मानशिंदे
अखिलेश यादव यांच्या घराबाहेर पोलिसांची गाडी आंदोलकांनी पेटवली

२००२ साली ड्रींक अँड ड्राइव्ह प्रकरणात त्यांनी अभिनेता सलमान खानलाही जामीन मिळवून दिला होता. त्यानंतर सलमान खानची या प्रकरणात कोर्टाने मुक्तता केली. सतीश मानशिंदे यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींचा खटला लढवण्याचा ताजे प्रकरण म्हणजे रेहा चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक. मागच्यावर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना अटक केली होती. रेहा आणि तिच्या भावाला दोघांना कोर्टाने जामीन मंजूर केला. प्रसिद्ध वकिल राम जेठमालानी यांच्या मार्गदर्शनाखाली १९८३ साली सतीश मानशिंदे वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. त्यांनी दहा वर्ष जेठमालानी यांच्यासोबत काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com