

मिलिंद तांबे
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ईको-संवेदनशील क्षेत्राचा मसुदा आराखडा सध्या राज्यात पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी समाजाच्या तीव्र चर्चेचा विषय ठरत आहे. या आराखड्यावर स्थानिक आदिवासींसह पर्यावरण संस्थांनी सविस्तर आणि तीव्र हरकती नोंदवल्या असून, हा आराखडा संवर्धनाऐवजी बांधकामकेंद्रित आहे. निसर्गावर घाव घालणारा दस्तऐवज ठरत आहे, असा आरोप केला आहे. याविरोधात उद्यान परिसरातील आदिवासी समाजानेही एल्गार पुकारण्याची घोषणा केली आहे. आमच्या भूमीवरचे निर्णय आमच्यावाचून कसे घेतले जात आहेत, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.