
Sanjay Gandhi National Park
ESakal
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसंवेदनशील क्षेत्रासाठी (पर्यावरणीयदृष्ट्या नाजूक क्षेत्र) तयार करण्यात आलेल्या झोनल मास्टर प्लॅनच्या मसुद्याला आदिवासी समाजाकडून तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे. या आराखड्याची अधिसूचना इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करण्यात आल्याने स्थानिक आदिवासींना ती समजणे कठीण असून, ‘आमच्याशी चर्चा न करता आमच्याच भूमीवर आराखडे काढले जात आहेत,’ असा संताप आदिवासी समाजातून व्यक्त होत आहे.