संजय गांधी उद्यानातील वाघाचा कर्करोगाशी लढा अपयशी

संजय गांधी उद्यानातील वाघाचा कर्करोगाशी लढा अपयशी

मुंबई - दुर्मिळ कर्करोगाचे निदान झाल्यानंतर १० दिवसांतच बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘यश’ वाघाचा मृत्यू झाला आहे. मे महिन्यातच वृद्धापकाळामुळे मुंबईतील शेवटचा पांढरा वाघ असलेल्या ‘बाजीराव’चा मृत्यू झाला. महिन्याभरातच उद्यान प्रशासनाने दोन वाघ गमावले आहेत. मात्र, यशच्या आठवणी जपण्यासाठी त्याची टॅक्‍सीडर्मी करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे. 

यशच्या तोंडाजवळ रेबडोमायोचारकोमा अशा दुर्मिळ कर्करोगाचे निदान झाले होते. दोन शस्त्रक्रिया करून तोंडाजवळील गाठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढूनही कर्करोग शरीरात पसरला होता. यशच्या पेशींचे नमुने तपासणीसाठी खासगी पॅथॉलॉजी केंद्रात पाठवण्यात आले होते. त्या वेळीही त्याला दुर्मिळ कर्करोग असल्याचे उघडकीस आले होते. वर्षभरापासून यशने खाणे कमी केल्याने त्याचे वजन सत्तर किलोनी घटले होते. त्यामुळे लायन सफारीतील वैद्यकीय पिंजऱ्यात उपचार घेणाऱ्या यशला अशक्त पाहणे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाच अवघड होऊन बसले होते. तोंडाचा कर्करोग झाला की अंतर्गत अवयवात तो अल्पावधीत पसरतो. त्यात अवयव निकामी होण्याची शक्‍यता असते. यशचे अखेरच्या काळात अवयव निकामी होत गेले. उद्यानातच ११ वर्षांपूर्वी पलाश आणि बसंती यांच्या मिलनातून जन्मलेल्या यशला मरणासन्नावस्थेत पाहणे वन अधिकाऱ्यांनाही जड जात होते. मार्च महिन्यात यशवर शेवटची शस्त्रक्रिया झाली होती.

यशच्या आठवणी जपण्यासाठी त्याची टॅक्‍सीडर्मी (मरणानंतर शरीर जतन करण्याची प्रक्रिया) केली जाणार आहे. परळ पशुवैद्यकीय रुग्णालयाचे टॅक्‍सीडर्मिस्ट डॉ. संतोष गायकवाड यशची टॅक्‍सीडर्मी करतील. 
- अन्वर अहमद, संचालक व मुख्य वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्‍सीडर्मी 
  माया (सिंहीण), रंगा (सिंह), शिवा (वाघ), राजा (नर बिबट्या) आणि राणी (मादी बिबट्या).
  भायखळ्यातील राणीबागेतील शेवटची सिंहीण जिमीची टॅक्‍सीडर्मी पूर्ण झाली आहे.
  गुजरात वनविभागाचा एक वाघ आणि बिबट्याची टॅक्‍सीडर्मी पूर्ण झाली आहे.
  भोपाळ वनविभागाच्या वाघाची टॅक्‍सीडर्मी पूर्ण.
  उत्तराखंड वनविभागाकडून देशातील शेवटच्या सायबेरियन वाघ आणि बर्फाळ बिबट्या (स्नो लेपर्ड)ची टॅक्‍सीडर्मी बनवली गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com