National Park Toy Train: नॅशनल पार्कमधील वनराणी कधी धावणार? ५ वर्षांपासून पर्यटक प्रतिक्षेत; महत्त्वाची माहिती समोर
SGNP Toy Train Update: नॅशनल पार्कमधील मिनी टॉय ट्रेन तब्बल ४ वर्षानंतर ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न प्रगतीपथावर होता. मात्र अद्याप ही सेवा सुरु झाली नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
कांदिवली : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन वनराणी कधी धावणार, असा प्रश्न भेट देणारे पर्यटक विचारित आहेत. २०२१ च्या ‘तौक्ते’ वादळात वनराणी बंद पडली होती. तेव्हापासून पर्यटकांचा हिरमोड सुरू आहे.