Sanjay Kelkar: ...वेळ पडली तर आम्ही वेगळा विचार करू, ठाणे पालिकेच्या विजयानंतर भाजप आमदारांचा इशारा

TMC Election: शिवसेनेसोबतच्या युतीमुळे भाजपने ठाण्यात घवघवीत यश प्राप्त केले आहे. तथापि, ठाणे पालिकेच्या विजयानंतर भाजप आमदार संजय केळकर यांनी इशारा दिला आहे.
Sanjay Kelkar

Sanjay Kelkar

ESakal

Updated on

ठाणे : गेल्या ४० वर्षामध्ये असे यश भाजपला मिळाले नव्हते, इतका मतटक्का वाढला आहे, त्यामुळे भविष्यात भाजप मोठी भरारी घेईल. असा विश्वास व्यक्त करीत, आम्ही एकत्र लढलोय त्यामुळे एकत्रच राहू, तरी अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते, तेव्हा वेळ पडली तर आम्ही वेगळा विचार करू असा सूचक इशारा भाजप आमदार संजय केळकर यांनी दिला. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादीत केले. त्याबद्दल माहिती देण्यासाठी शनिवारी वर्तकनगर येथील भाजप विभागीय कार्यालयात सर्व विजयी नगरसेवकांसमवेत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com