निरुपम यांना काँग्रेसने फटकारले

पीटीआय
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

मुंबई - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या सत्यतेबद्दल मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र नंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच त्यांना याबाबत फटकारले. 

निरुपम यांच्या विधानांशी पक्ष संपूर्णपणे असहमत असल्याचे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की निरुपम यांच्या विधानांची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. 

भारतीय लष्कराच्या शौर्यावर पक्षाचा पूर्ण विश्‍वास आहे.’’ याबाबत निरुपम यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावणार का, या प्रश्‍नाला त्यांनी बगल दिली. याप्रकरणी पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनीही आपण सरकारच्या पाठीशी आहोत, असे सांगितल्याचा दाखलाही त्यांनी दिला. 

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही यासंदर्भात निरुपम यांना घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले, की राजकीय पक्षनेत्यांनी या ‘सर्जिकल स्ट्राइक’बाबत विधाने टाळली पाहिजेत. निरुपम नेमके काय बोलले हे आपल्याला ठाऊक नाही, मात्र नेत्यांनी या विषयावर बोलू नये. तर माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनीही निरुपम यांच्या विधानाशी असहमती दर्शविली.

पाकिस्तान मागतोय म्हणून भारताने सर्जिकल स्ट्राइकचे पाकिस्तानला पुरावे द्यावेत, असे जे नेते म्हणतात, त्यांनी पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारावे.
- उमा भारती, केंद्रीय मंत्री

Web Title: sanjay nirupam