esakal | संजय निरुपम यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान; ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी...  
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay-nirupam_ and uddhav thackeray

वांद्रे कलानगर येथील मातोश्री निवासस्थानासमोरील एक बंगला उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी खरेदी केला होता. या ठिकाणी आता बहुमजली बंगला उभारला जात आहे.

संजय निरुपम यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान; ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी...  

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : वांद्रे कलानगर येथील मातोश्री निवासस्थानासमोरील एक बंगला उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी खरेदी केला होता. या ठिकाणी आता बहुमजली बंगला उभारला जात आहे. ठाकरे यांनी 2016 मध्ये ही जागा राजभूषण दिक्षीत यांच्याकडून खरेदी केली होती. मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली राजभूषण आणि त्यांचे बंधू हे सध्या कोठडीत असून त्यांच्या व्यवहारांची अमंलबजावणी संचनालया (ईडी) मार्फत चौकशी सुरु आहे.

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांना अखेरचा निरोप; माझगाव कब्रस्थानात झाला दफनविधी...

त्यामुळे त्याबरोबरच ठाकरे यांनी विकत घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराचीही ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. एवढ्या मोक्‍याची जागा अवघ्या 5 कोटी 80 लाखात विकली जाणे शक्‍य नाही. ही दहा हजार चौरस फुटांची जागा असून तीची किंमत व्यवहाराच्या पाचपट असल्याचा दावाही निरुपम यांनी केला.

लॉकडाऊन असतानाही नवी मुंबईत का वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या नेमकी परिस्थिती...

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या 'मातोश्री 2' या निवासस्थानासाठी झालेल्या जमीन खरेदीवर आक्षेप घेत या खरेदीची चौकशी करण्याची मागणी मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच थेट मु्ख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत कॉंग्रेसकडून अद्याप कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

वसई-विरारमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा; मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा...

निरुपम हे शिवसेनेत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या हिंदी सामनाचे कार्यकारी संपादक होते. त्याच बरोबर ते शिवसेनेचे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन ते लोकसभेवरही निवडून आले होते. मात्र,गेल्या काही वर्षांपासून कॉंग्रेसच्या नेत्यांनीही त्यांच्यापासून फारकत घेतली असून महाविकास आघाडीला सुरुवातीपासूनच त्यांनी विरोध केला होता.
---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image