esakal | महाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप ? शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा...
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप ? शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा...

शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. - संजय राऊत 

महाराष्ट्रात पुन्हा येणार मोठा राजकीय भूकंप ? शरद पवारांची मातोश्रीवर हजेरी, दीड तास चर्चा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकारण तापलंय. अशात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय हालचाली होतायत. वरवर सर्व आलबेल आहे असं दिसत जरी असलं तरीही पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार का ? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? याबद्दल आता कुजबुज सुरु झालीये. 

याला कारण ठरतंय ते म्हणजे राजभवनावर सातत्याने होणाऱ्या बड्या नेत्यांच्या बैठका. यामध्ये राजभवनावर विरोधकांनी लावलेला सपाटा असेल. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बैठकीसाठी दिलेलं आमंत्रण. स्वतः शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांची आणि राज्यपालांची भेट. त्यानंतर शरद पवारांची राजभवनावरील हजेरी आणि लगेचच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची राजभवनावरील भेट.

मात्र भेटीगाठी यावरच थांबल्या नाहीत. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त बैठक झाली मातोश्रीवर.

BIG NEWS - तासाभरात करता येणार कोरोनाचे निदान, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या 'टेस्ट'ची निर्मिती

मातोश्रीवरील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. स्वतः संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलंय. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, " मा. शरद पवार व मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे यांची काल संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन नेत्यात दिड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरते बाबत बातम्यांचा धुरळा ऊडवीत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!

हृदयद्रावक ! "...यांनी उशीर केला, माझे पप्पा गेले हो"; बेडसाठीची १२ तासांची फरफट व्यर्थ

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक यासाठी महत्त्वाची मानली जातेय कारण विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. यावेळी ३६ दिवसांच्या सत्ता संघर्षात शरद पवार एकदाही मातोश्रीवर गेले नव्हते. अशात शरद पवार त्यांचं स्वतः मातोश्रीवर जाणं अनेक प्रश्न निर्माण करणारं आहे.

sharad pawar visits matoshree to meet cm uddhav thackeray both leaders spoke for 90 minutes

loading image