Sanjay Raut : महाविकास आघाडीत समन्वय हवा, काँग्रेसचे कान उपटत संजय राऊतांचा सल्ला

Sanjay Raut on congress
Sanjay Raut on congress
Updated on

Sanjay Raut : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीत देखील बिघाडी दिसत आहे. काँग्रसचे निष्ठावान असलेले सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. (sanjay raut reaction on graduate election)

काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. महाविकास आघाडीत समन्वय नसल्याची टीका होत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. 

सामान्य किमान कार्यक्रमावर महाविकास आघाडीचे सरकार होते. हे सरकार आम्ही चालवले. तिन भिन्न पक्षाचे लोक एकत्र आले आणि सरकार चालवले. त्यामुळे आघाडीत समन्वय होता. ज्या पद्धीतने सरकार चालवले तोच समन्वय आणि एकोपा विरोधी पक्षात काम करताना सुद्धा असावा. तरच आपण पुढील सर्व लढाया एकत्रपणे लढू शकतो, असे मत संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

Sanjay Raut on congress
मोठी बातमी! काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचं निधन; भारत जोडो यात्रेत आला हृदयविकाराचा झटका

संजय राऊत म्हणाले, "विधानपरीषद निवडणुकीमध्ये जो गोंधळ झाला तो झालेलाच आहे. तुम्ही नाकारु शकत नाही. त्याकडे महाविकास आघाडी म्हणून लक्ष द्यायला पाहीजे. या पाच जागांच्या निवडणुकासंदर्भात ज्या पद्धतीने एकत्रीत बसून भूमिका ठरवणे, चर्चा व्हायला पाहीजे होती, मात्र ते झालं नाही."

Sanjay Raut on congress
Mahesh Manjrekar : "बोल तेरे साथ...? " बीडकरांनी महेश मांजरेकरांविरुद्ध छेडलं बँडबाजा आंदोलन

"नागपूर, अमरावती या दोन्ही जागेसंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता त्यांनी आमचा उमेदवार घेतला. आम्ही सुद्धा लढलो असतो. नाशिकचा जो घोळ झाला त्यासंदर्भात कुणालाच दोष देता येणार नाही. अशा प्रकारच्या उलट्या-पालट्या सर्वच पक्षात होत असतात," असे संजय राऊत म्हणाले. 

Sanjay Raut on congress
Pune News : पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com