

Sanjay Raut song on Amit Shah
esakal
Mumbai) : ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर सडकून टीका केली. 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाहीत. अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई आहेत,' असा आरोप करत राऊत यांनी खळबळ उडवून दिली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेलेच माफिया असल्याचा दावा करत, देशात सत्ताबदलाची गरज असल्याचेही ते म्हणाले.