
भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला : संजय राऊत
मुंबई : मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवून भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. भोंग्याच्या वादामुळे आज अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये सकाळच्या काकड आरतीला (Kakad Aarti) भाविकांना मुकावे लागल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मनसेमुळेच (MNS) आज लाखो हिंदू भाविकांची गैjसोय झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भोंग्यांबाबतचा नियम सर्वांसाठी समान असून तो कुठल्याही एक धर्मीयांसाठी नाही. देशभरात उत्तर प्रदेशात याच नियमाचं पालन झालं आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका सर्वात जास्त कुणाला बसला असेल तर, तो हिंदू तीर्थस्थानं, मंदिरं आणि हिंदू भाविकांना बसल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. (Sanjay Raut Attack On Raj Thackeray & BJP)
हेही वाचा: 'भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचा...', राज यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांचं ट्विट
मशिदींवरील भोग्यांचं निमित्त करून भाजपने (BJP) हिंदूंचा आणि हिंदुत्त्वाचा गळा घोटल्याचं स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. आज सकाळपासून हजारो नागरिकांना फोन, पत्र अशा अनेक पद्धतींने तक्रारी करत आमच्यावर हा अन्याय का होतोय? आमचा गुन्हा काय? असा प्रश्न विचारल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज सकाळी शिर्डीमध्ये काकड आरतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र, ही आरती भाविकांना ऐकू न आल्याने त्यांचा हिरमोड झाल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Shirdi Kakad Arati)
हेही वाचा: Hanuman Chalisa Row : 'धार्मिक रंग दिला तर...', राज ठाकरेंचा सरकारला इशारा
मनसेमुळेच आज लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे हिंदुत्त्वासाठी आणि भाविकांसाठी आजचा दिवस काळा दिवस असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर हिंदुनी संयम राखावा असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. भोंग्यांबाबतचा नियम सर्वांसाठी समान असून तो कुठल्याही एक धर्मीयांसाठी नाही. देशभरात उत्तर प्रदेशात याच नियमाचं पालन झालं आहे. मात्र, याचा सर्वाधिक फटका सर्वात जास्त कुणाला बसला असेल तर, तो हिंदू तीर्थस्थानं, मंदिरं आणि हिंदू भाविकांना बसल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: Hanuman Chalisa Row LIVE| पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय बोलले? जाणून घ्या प्रमुख मुद्दे!
महाराष्ट्रातील भोग्यांबाबत काय करायचं यासाठी कायदा आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. त्यानुसारच कारवाई होईल. मशिदींवरील भोग्यांचा निर्णय खासगी व्यक्ती घेऊ शकत नाही असे सांगत सुप्रीम कोर्टाच्या वर कुणीही नाही. जर तुम्ही समान नागरी म्हणत असाल तर, एक कायदा सर्वांसाठी आहे. त्यालाच समान नागरी कायदा म्हटले जाते. भोंग्यांचा हा वाद धार्मिकच असून, हे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान असून, भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला असल्याचे ते म्हणाले.
Web Title: Sanjay Raut Attack On Bjp On Loud Speaker Row
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..