esakal | "माझं खासगी आयुष्य तिथेच संपलं", मुलाखत देताना संजय राऊत झालेत भावनिक
sakal

बोलून बातमी शोधा

"माझं खासगी आयुष्य तिथेच संपलं", मुलाखत देताना संजय राऊत झालेत भावनिक

शिवसेनेचे फायरब्रँड नेते, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती.

"माझं खासगी आयुष्य तिथेच संपलं", मुलाखत देताना संजय राऊत झालेत भावनिक

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : शिवसेनेचे फायरब्रँड नेते, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती. अर्थात मुलाखत संजय राऊत यांची असल्याने आणि ती कुणाल कामरा याने घेतल्याने तरुणाईसोबत अनेकांना या मुलाखतीत नक्की काय आहे याची उत्सुकता होती. अशात आता स्टँडअप कॉमेडियन कुणालने  'शटअप या कुणाल' या शो साठी घेतलेली राऊतांची पॉडकास्ट मुलाखत पब्लिश केलीये. काल (शुक्रवारी) ही मुलाखत प्रकाशित करण्यात आलीये. 

महत्त्वाची बातमी ७३ वर्षांनंतर मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या शिवाजी पार्कच्या नावात बदल

यामध्ये एका प्रश्नाचे उत्तर देतांना संजय राऊत भावनिक झालेले पहायला मिळाले.  कुणालने राऊतांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत भावनिक झालेत.

या प्रश्नाचं उत्तर देताना राऊत म्हणालेत की, "सामना हे एक राजकीय वृत्तपत्र, बाळासाहेब ठाकरे हे त्याचे प्रमुख आणि त्यांच्यासोबत काम करणं, त्यांच्या विचारांना पुढे नेणं हे त्यावेळी अतिशय महत्त्वाचं होतं. भूमिपुत्रांना न्याय मिळावा तसेच राज्यातील नागरिकांना सगळ्यात आधी रोजगाराचा हक्क मिळाला पाहिजे असं त्यांचं मत होतं. मी खूप कमी वयात म्हणजे वयाच्या २८ व्या वर्षी सामनाचा संपादक झालो. बाळासाहेब ठाकरेंनी मला वयाच्या २८ व्या वर्षीच सामनाचा संपादक म्हणून नेमलं. त्यामुळे माझं खासगी आयुष्य तिथेच संपलं. मी पूर्ण वेळ माझ्या कामाला देतो. बाळासाहेबांसोबत काम करणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी पूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत लावलं आहे. त्यामुळे मला खासगी आयुष्य नाही, ते मी मानत नाही असं उत्तर संजय राऊत यांनी कुणालला दिलं.

महत्त्वाची बातमी दिवाळीनंतर मुंबई पोलिसांतील ५५ वर्षांवरील पोलिस बांधवाना पुन्हा कर्तव्यावर बोलावलं जाण्याची पडताळणी सुरु

या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी कुणालच्या विविध प्रश्नाची रोखठोक उत्तरे दिली आहेत. ज्यामध्ये राज्यातील तीन पक्षांचे एकत्रित असणारे महाविकास आघाडी सरकार, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रनौत, विरोधीपक्ष भारतीय जनता पक्ष , कोरोनाचा संवेदनशील काळ या मुद्द्यांचा या मुलाखतीत समावेश आहे.  

sanjay raut became emotional when kunal kamra asked him about his personal life