राऊतांचे चुकलेच... राष्ट्रवादीच्या नेत्याचे टीकास्त्र 

गिरीश त्रिवेदी
बुधवार, 29 जानेवारी 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ज्याप्रकारे निंदनीय होते त्याचप्रमाणे उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागणे हेही तितकेच चुकीचे असून याबाबत संजय राऊत यांचे चुकलेच, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या दादाज फिटनेस सेंटरचे उद्‌घाटन अमोल मिटकरी आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना मिटकरी यांनी वरील टीका केली. 

बदलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ज्याप्रकारे निंदनीय होते त्याचप्रमाणे उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागणे हेही तितकेच चुकीचे असून याबाबत संजय राऊत यांचे चुकलेच, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष व गटनेते कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या दादाज फिटनेस सेंटरचे उद्‌घाटन अमोल मिटकरी आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना मिटकरी यांनी वरील टीका केली. 

मोदीची मी चालू तरी शकतो का? की त्यावरही बंदी घातली?

दिल्लीतील एका भाजप पदाधिकाऱ्याने देशाच्या पंतप्रधानांना आजच्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज दाखवण्याचा प्रयत्न केला तो निंदनीय आहे. मात्र त्याचवेळी या वादातून उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागणे हेही तितकेच निंदनीय आहे. संजय राऊंत यांचे याबाबत चुकलेच.

भाजप, केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका अमोल मिटकरी यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना केल्यानंतर त्यावर मोजक्‍या लोकांच्या विरोधी प्रतिक्रिया आल्या. हीच तुलना शिख समुदायातील एखाद्या गुरूंशी केली असती तर आज देशात वेगळे चित्र असते, अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

शिवभोजन थाळी येणार थेट तुमच्या दारी

या कार्यक्रमप्रसंगी भाजपचे संजय आगिवले, युवा सेना सचिव सुदाम घुगे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सुखदेव गायकवाड यांच्यासह शिवसेना आणि भाजपमधून अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे, सूरज चव्हाण, सुहास खामकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

'तान्हाजी'त चुकीचा इतिहास 
नुकताच प्रदर्शित झालेल्या "तान्हाजी' चित्रपटाच्या इतिहासावरही अमोल मिटकरी यांनी यावेळी भाष्य केले. तान्हाजी चित्रपटात तानाजी मालुसरे यांचे नाव तान्हाजी असे दाखवण्यात आले आहे. मात्र त्यांचे नाव तानाजी मालुसरा असे आहे. त्यांचे जन्मगावही उमरट नसून साताऱ्याजवळच्या पाचगणी येथील गोडवली येथील आहे. पुढे ते आपल्या मामाच्या गावी उमरटला आले. मात्र चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असून त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाईही केली जाते आहे, असेही मिटकरी यांनी यावेळी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut criticizes NCP leader