Sanjay Raut Eknath Shinde
Sanjay Raut Eknath ShindeSakal

राऊतांच्या घरात सापडलेल्या १० लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचे नाव

याप्रकरणी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या घरातून ११ लाखांची रोकड सापडली आहे. यापैकी १० लाखांची रक्कम असलेल्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. (Sanjay Raut arrest by ED)

Sanjay Raut Eknath Shinde
Sanjay Raut Arrested : 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक; आज कोर्टात हजर करणार

पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली. जवळपास १६ तास चौकशी केल्यानंतर राऊतांना अटक करण्यात आली आहे. राऊतांच्या भांडुप येथील घरातून ईडीने ११ लाखांची रोकड जप्त केली आहे. या ११ लाखांपैकी १० लाखांच्या नोटांच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या असा उल्लेख असल्याची खळबजनक माहिती सुनील राऊत यांनी दिलीये.

Sanjay Raut Eknath Shinde
संजय राऊतांची कोर्टात हजेरी ते ईडी कोठडी; दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या

या प्रकरणी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले की, असं असण्याची शक्यता आहे की एकनाथ शिंदेंच्या विरोधात त्यांना जे काही करायचं आहे, त्यासाठी त्यांना अयोध्येला जायचं असेल आणि म्हणून त्यांनी हे पैसे राखीव ठेवले असतील. त्यामुळे प्रत्येक पैशाचा सोर्स दाखवावा लागतो, त्यांनी तो दाखवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com